जयहिंदतर्फे ऑनलाइन संवादकट्ट्यावर कोरोनामुक्त गावाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:21+5:302021-06-29T04:24:21+5:30

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ...

Coal-free village resolution on online dialogue by Jayhind | जयहिंदतर्फे ऑनलाइन संवादकट्ट्यावर कोरोनामुक्त गावाचा संकल्प

जयहिंदतर्फे ऑनलाइन संवादकट्ट्यावर कोरोनामुक्त गावाचा संकल्प

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रानमळा गावचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण पवार यांनी भूषविले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तानुबाई गावडे, सदस्य चेतन पाटील, मनोज उचाळे, रवींद्र मालशिकारे आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. पंकज नन्नवरे यांनी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव मोहिमेचा संकल्प, त्याचे महत्त्व आणि त्याची व्याप्ती यावर सखोल मार्गदर्शन केले. कोरोनामुक्त गाव करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत गावकऱ्यांनी सहभागी होण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्याचबरोबर गावकऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्यासंबंधी जनजागृती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रवीण पवार यांनी 'माझे गाव कोरोना मुक्त'चा संकल्प सोडला व या राष्ट्रीय उपक्रमात रासेयो विभागाला सोबत घेऊन सर्वतोपरी काम करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयोचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत कसबे यांनी तर आभार महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. योगिता पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.पवार, उपप्राचार्य प्रा. व्ही.एस.पवार, डॉ.डी.के.पाटील व डॉ.व्ही.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत कसबे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.योगिता पाटील व साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रतीक शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Coal-free village resolution on online dialogue by Jayhind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.