शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कापडणे पं.स. सदस्य राजेंद्र पाटील काँग्रेस पक्षात, भाजपला पुन्हा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST

धुळे : तालुक्यातील कापडणे येथील पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील यांनी आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश ...

धुळे : तालुक्यातील कापडणे येथील पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील यांनी आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने ताब्यात घेतलेली ग्रामपंचायत आणि अपक्ष पं.स.सदस्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश, त्यामुळे जि.प.गटात भाजपच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंचायत समितीच्या निवडणुकीत धुळे पंचायत समितीवर भाजपने सत्ता स्थापन केली आहे. मात्र, भाजपच्या पं.स.वरील मनमानी कारभाराला शह देण्यासाठी कापडणेचे पं.स.गणाचे अपक्ष उमेदवार राजेंद्र बाबुराव पाटील यांनी आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. धुळे तालुक्यात आणि कापडणे जि.प., पं.स. गणात आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे गतीने सुरू आहेत. गटनेते काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कापडणे पं.स.गणातील विकासासाठी मी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल पाटील यांचा आमदार कुणाल पाटील यांनी स्वागत व सत्कार केला. दरम्यान, आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते कापडणे ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या वंदनाबाई नवल पाटील, लताबाई आसाराम पाटील, हरिश पाटील, अंकिता अंजन पाटील, नीलेश जैन, उज्ज्वला बटू माळी, हिंमत चौधरी, सोनाबाई भिल, अक्काबाई भिल, जितू भिल, नाना भामरे, प्रवीण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अश्‍विनी कुणाल पाटील, उद्योगपती शेखर पाटील, अरुण पाटील, अमोल पाटील, अशोक पाटील, सागर पाटील, सतीश बोरसे, दिलीप पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते.