राष्ट्रपती राजवटीनंतर सत्ता स्थापनेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:01 PM2019-11-13T12:01:48+5:302019-11-13T12:02:37+5:30

सरकार स्थापनेबाबत विश्वास : लोकप्रतिनिधीकडून एकमेकांवर दोषारोप ; राष्ट्रवादीकडून भाजपाचा निषेध

Claim to establish power after presidential rule | राष्ट्रपती राजवटीनंतर सत्ता स्थापनेचा दावा

Dhule

googlenewsNext

धुळे : राज्यात सत्ता स्थापन् करण्यासाठी राष्टपदींनी महायुतीसह आघाडी सरकारला आंमत्रित केले होते़ मुदतीपूर्वी राष्ट्रवादी पक्षाला देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागु करण्यात आले़ याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडून सत्ता स्थापनेसाठी दावा-प्रतिदावा केला जात आहे़
भाजप सरकार सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल
राज्यात राष्ट्रपती राजवट जरी लागु असले तरी पंधरा दिवसाच्या आत भाजप सरकार सत्ता स्थापन करण्यात निश्चित यशस्वी होईल़
-डॉफ़ारूख शाह
-आमदार, धुळे शहर
राज्याला राष्ट्रपती राजवट
लागणे हे दुदैव
राज्यातील जनतेने अतिशय स्पष्ट बहुमत दिले असताना सरकार स्थापन होणे महत्वाचे होते, परंतु तसे न होणे हे दुर्देवी आहे़ त्यामुळे जनतेची गैरसोय होईल या स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आवश्यक असल्याने स्थिर सरकार मिळण्यासाठी सर्वच पक्षानी प्रयत्न करावे
-जयकुमार रावल
आमदार शिंदखेडा
राष्ट्रवादीतर्फे भाजप
सरकारच्या मनमानीचा निषेध
भाजपाला कंटाळून शिवसेना सत्तेतून बाहेर पडली होती़ राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षांनी शेतकऱ्यांचा हिताचा विचार करून शिवसेनेला पाठिबा दिला होता़ राज्यपालांनी घटनाबाह्य निर्णय घेऊन मुदतीच्या आत प्रस्ताव पाठविल्याने सत्ता स्थापन करण्यात अपयश आले़ मनमानी करणाºया सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत़
-किरण शिंंदे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
भाजपाच्या स्वार्थी पणामुळे राष्ट्रपती लागवट लागू
मोदीचे भाजपाचे सरकार स्वार्थी असल्याने राष्ट्रपती राजवट लागु होण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला कमी वेळ दिला़ त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात अपयश आले़ मात्र याचा काहीही उपयोग होणार नाही़ सत्ता ही भाजप विरहीतच असणार आहे़
-युवराज करनकाळ
जिल्हाध्यक्ष काँग्रेस
राज्यात महायुतीचे पुन्हा
सरकार स्थापन होईल
भाजप सरकारला जनादेश मिळाला आहे़ त्यामुळे सत्ता देखील भाजपाची राहील़ दोन्ही पक्षांनी चर्चा करून सरकार स्थापन करावे अशी अपेक्षा
-काशिराम पावरा
आमदार, शिरपूर
भाजपाला राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई झाली होती
भाजपाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई झाली होती़ त्यामुळे भाजपाला २३ तास तर भाजपाला ४८ तासांची वेळ दिली गेली होती़ त्यामुळे अल्पवेळेत शिवसेनेला सत्ता स्थापना करता येवू शकली नाही़ चुकीच्या पध्दतीने राजवट लागू करण्यात आल्याची माहिती ज्येष्ट कायदे तज्ञांनी देखील मान्य केले आहे़
- हिलाल माळी
शिवसेना, जिल्हाध्यक्ष
शिवसेनेच्या आठमुटे पणामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट योग
राष्ट्रपती राजवट लागु होणे ही दु:खाची गोष्ट आहे़ महायुतीकडे संख्याबळ असतांनाही शिवसेनेच्या आडमुठेपणाने सत्ता स्थापन करता येवू शकली नाही़ निवडणूकीपूर्वी ज्यांना आपण शिव्या देते होतो़ त्याच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय चुकीचा आह़े
-अनुप अग्रवाल
जिल्हाध्यक्ष भाजपा

Web Title: Claim to establish power after presidential rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.