सिव्हिलचे शवविच्छेदन गृह हिरे रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:25 IST2021-07-02T04:25:01+5:302021-07-02T04:25:01+5:30
शासनाच्या निर्देशानुसार या इमारतीचे लोकार्पण तसेच उद्घाटन केले जाणार आहे़ शहरातील जिल्हा रुग्णालयातून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

सिव्हिलचे शवविच्छेदन गृह हिरे रुग्णालयात
शासनाच्या निर्देशानुसार या इमारतीचे लोकार्पण तसेच उद्घाटन केले जाणार आहे़ शहरातील जिल्हा रुग्णालयातून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे मार्च २०१६ मध्ये चक्करबर्डी येथे स्थलांतरीत करण्यात आले़ मात्र जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन गृहाचे स्थलांतर इमारतीअभावी झाले नव्हते़ त्यामुळे हिरे रुग्णालयातील मृतांचे शवविच्छेदन गेल्या पाच वर्षापासून जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातच केले जात होते़ तथापि जिल्हा रुग्णालयातील जागा ही जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अख्यत्यारीत आहे़ त्यामुळे ही जागा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे हस्तांतरीत करणे अनिवार्य होते़ यामुळे हिरे रुग्णालयाने न्यायालयाच्या निर्देशानुसार चक्करबर्डी येथील स्वत:च्या जागेत शवविच्छेदनासाठी नवी सुसज्ज इमारत बांधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु ठेवले होते़ या इमारतीचे काम पूर्ण झाल्याने हिरे रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातील सर्व साहित्य स्वत:कडे हस्तांतरीत करुन घेत आपल्या नव्या इमारतीत १ जुलैपासून शवविच्छेदनास सुरुवात केली़ तसेच जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाची जागा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ताब्यात देण्यात आली़ दरम्यान, हिरे रुग्णालयातील या नव्या इमारतीचे उद्घाटन शासनाच्या निर्देशानंतर केले जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ़ पल्लवी सापळे यांनी दिली़
हे आहेत सुविधा
हिरे रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन गृहासाठी बांधण्यात आलेली नवी इमारत ही सोयीसुविधांनी युक्त अशी आहे़ सुमारे दीड ते दोन हजार चौरस मिटर जागेत ही दुमजली इमारत बांधण्यात आली असून पहिल्या मजल्यावर शवविच्छेदनाची सोय करण्यात आलेली आहे़ इमारतीत हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाचे प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी गॅलरी, कर्मचारी तसेच पोलिसांसाठी स्वतंत्र्य खोल्या, मृतदेह ठेवण्यासाठी शितगृह अशा काही सुविधा आहेत़ जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृह हे अतिशय कमी जागेत असल्याने अडचणी देखील येत होत्या़ आता मात्र सुसज्ज आणि मोठ्या जागेत ही स्वतंत्र इमारत बांधण्यात आल्याने कर्मचाºयांसह पोलिसांची देखील सोय झाली आहे़