निजामपूर ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचे निर्विवाद बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:37 AM2021-01-19T04:37:04+5:302021-01-19T04:37:04+5:30

गावाच्या विकासाचा मुद्दा दोन्ही पॅनलने मतदारांपुढे ठेवत प्रचार केला होता. यंदाच्या निवडणुकीत तीन उमेदवारवगळता सर्वच उमेदवार नवीन होते. बाहेरचे ...

City Development Front's undisputed majority in Nizampur Gram Panchayat | निजामपूर ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचे निर्विवाद बहुमत

निजामपूर ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचे निर्विवाद बहुमत

Next

गावाच्या विकासाचा मुद्दा दोन्ही पॅनलने मतदारांपुढे ठेवत प्रचार केला होता. यंदाच्या निवडणुकीत तीन उमेदवारवगळता सर्वच उमेदवार नवीन होते. बाहेरचे कुणीही नेते प्रचारासाठी आले नव्हते. स्थानिक संबंध आणि रुसवे फुगवे मतदारांनी मनात ठेवत मतदान केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मतदार हे शांत होते, त्यांनी कळू न देता मतदान केल्याचे निकालावरून समोर येत आहे. यात केवळ चुरस होती ती उमेदवारांमध्येच. विजयाचा दावा बहुतेक सर्व उमेदवार करीत होते, पण निश्चित अंदाज येत नव्हता.

विजयी झालेल्या शहर विकास आघाडीचे उमेदवार याप्रमाणे, वार्ड १मध्ये शाम पवार, जिजाबाई सोनवणे, वार्ड ३मध्ये महेंद्र वाणी, शीतल गजानन शहा, शोभा चिंचोले, वार्ड ४मध्ये विजय राणे, नीलिमा भार्गव, कविता पवार, वार्ड ६मध्ये सुरेंद्र विसपुते, सुनीता परदेशी असे १० उमेदवार विजयी झाले आहेत.

ग्राम विकास पॅनलने वार्ड २ आणि ५ मधील सर्व जागा म्हणजे ६ पैकी ६ जागा पटकावल्या आहेत. त्यात वार्ड २ मध्ये मुस्ताकखान पठाण, सोनाली चौधरी, सपना मोरे. वार्ड ५मध्ये पुष्पांजली बच्छाव, रमेश कांबळे, ताहीरबेग मिर्झा यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.

वार्ड ६मध्ये नामाप्र जागेवर अत्यंत चुरशीची लढत उभी ठाकली होती. शहर विकास आघाडीतर्फे वासुदेव दत्तात्रय बदामे, तर स्वतंत्र उमेदवार परेश चंद्रकांत वाणी यांच्यात अत्यंत काट्याची टक्कर झाली. पण स्वतंत्र उमेदवार परेश वाणी यांनी बाजी मारली व ते विजयी झाले. शहर विकास आघाडीतर्फे गड आला, पण सिंह गेला अशा घोषणा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत काढलेल्या मिरवणुकीत गुलाल उधळत ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मतदारांचे घरोघरी जाऊन आभार मानले. शहर विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी ज्येष्ठ नेते शरद शाह यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

Web Title: City Development Front's undisputed majority in Nizampur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.