ॅशिक्षकांना मे महिन्याचे वेतन जूनपूर्वी देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:55 IST2019-05-10T11:54:51+5:302019-05-10T11:55:56+5:30
शिक्षक भारती संघटनेने दिले होते निवेदन

ॅशिक्षकांना मे महिन्याचे वेतन जूनपूर्वी देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
आॅनलाइन लोकमत
धुळे : रमजान सणानिमित्त जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन १ जून पूर्वी काढण्यात यावेत, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी वेतन पथक अधीक्षकांना दिले आहे.
मुस्लीम बांधवांचा रमजान सण सुरू झालेला आहे. येत्या ५ जून रोजी ईद सण साजरा केला जाणार आहे. मुस्लीम बांधवांना हा सण साजरा करावयाचा आहे. त्यामुळे मे २०१९ चे वेतन १ जून पूर्वी देण्यात यावे अशी मागणी धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेने (उर्दू व महिला आघाडी विभाग) यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांना ८ मे रोजी दिले होते.
या संदर्भात शिक्षणाधिकाºयांनी माध्यमिक विभागाच्या वेतन पथक अधीक्षकांना पत्र देवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे मे महिन्याचे वेतन १ जून पूर्वी देण्याचे आदेश दिले आहेत.
निवेदन देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे, शैलेश धात्रक, सचिन मोरे, हर्षल पवार, सी.टी.पाटील, कानिफनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.