नागरिकांना कोरोनाचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST2021-02-22T04:24:41+5:302021-02-22T04:24:41+5:30

अशात जिल्हा व राज्यात वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता वेळीच सावध पवित्रा व नियमांचे पालन करणे तसेच प्रशासनाने घालून ...

Citizens forget Corona fell | नागरिकांना कोरोनाचा पडला विसर

नागरिकांना कोरोनाचा पडला विसर

अशात जिल्हा व राज्यात वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता वेळीच सावध पवित्रा व नियमांचे पालन करणे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची गावात योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा कोरोनाचा उद्रेक होऊन संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

मालपूर हे तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे गाव आहे. साहजिकच वर्दळ दिवसभर कायम दिसून येते. मात्र नागरिकांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही. सरकारी कार्यालयात बँकेत सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही. भाजीपाला विक्री ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आदी ठिकाणी नेमून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. यासाठी कोरोना संसर्गाचा पुनश्च निर्माण झालेला वेग लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासन व कोविड १९ समितीने वेळिच सावध पवित्रा घेणे आवश्यक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लग्न समारंभ व इतर का इतर कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवर निर्बंध आणावेत. नागरिकांनी देखील स्वयंशिस्तीने घराबाहेर पडण्यापूर्वी तोंडावर मास्क लावावा. किराणा दुकानदार भाजीपाला विक्रेते यांनी तोंडावर मास्कशिवाय ग्राहकांना आपल्या दुकानावर उभे राहू देऊ नये सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर तसेच कुठल्याही समारंभात ५० पेक्षा जास्त जमा होणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी, दक्षता न घेतल्यास दंडात्मक कारवाई व आपत्कालीन कारवाईचा बडगा उगारावा तरच शिस्त लागेल व यासाठी कठोर निर्णय घ्यावेत, तरच कोरोनावर नियंत्रण येईल अन्यथा उद्रेक झाल्या शिवाय रहाणार नाही असेच आजचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Citizens forget Corona fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.