Child dies due to shock | शॉक लागल्याने बालकाचा मृत्यू
Dhule

धुळे : शहरातील साक्रीरोडवरील कुमारनगरात वीजेच्या खांबाचा शॉक लागून चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
मंगळवारी रात्री साडेदहा वाजे दरम्यान गल्लीतील रस्त्यावर शहरातील उद्योजक महेंद्र रेलन यांचा पुतण्या व प्रशांत रेलन यांचा मुलगा लव्यम प्रशांत रेलन (वय ४) हा मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता तो अचानकपणे विजेच्या खांबाजवळ आला. या खांबात वीज प्रवाह सुरु होता. लव्यमचा हात चुकून त्या खांबाला लागल्याने, तो दूर फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कोणाला काहीच समजण्याच्या आतच ही सगळी घटना घडली. काहींनी हा प्रसंग पाहिल्याने, त्यांना धक्काच बसला.
कुमारनगरात घडलेल्या प्रकाराची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने, अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

Web Title:  Child dies due to shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.