शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा दालनाची केली पाहणी अन रात्रीतून पदाला मुकावे लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:23 IST

रात्रीस खेळ चाले राजकारणाचा.... : कृषी विभागाच्या सभापतीपदाचा आग्रह धरल्याने, धुळे तालुक्यातील सदस्याने मिळालेली संधी घालवल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ‘दैव देते मात्र कर्म नेते’ याचा अनुभव जिल्हा परिषदेच्या एका सदस्याला आला आहे. सभापतीपदासाठी भाजपच्या एका वरिष्ठ सदस्याने सोमवारी जिल्हा परिषदेत जाऊन दालनाची पहाणी केली.मात्र एकाच विभागाचा आग्रह धरून बसल्याने, त्या सदस्याला सभापतीपदालाही मुकावे लागले. ‘रात्रीस खेळ चाले राजकारणाचा’ याचा अनुभव या सदस्याला आला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीनंतर विषय समिती सभापतीपदावर वर्णी लागावी यासाठी अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले होते. सभापतीपदी निवड करतांना अनुभवी व नवीन चेहरे असा समतोल राखण्याचा पक्ष श्रेष्ठींचा विचार होता. त्यामुळे धुळे तालुक्यातून एका अनुभवी सदस्याला सभापतीपदाची संधी देण्याचेही जवळपास निश्चित झाले होते. सभापतीपदावर वर्णी लागणार असा आत्मविश्वास असलेल्या ‘त्या’ज्येष्ठ सदस्याने सोमवारी जिल्हा परिषदेत जाऊन आपल्या मिळणाऱ्या संभाव्य दालनाचीही पहाणी केल्याची परिषदेचे कर्मचारी सांगतात.त्या सन्माननीय सदस्यांनी यापूर्वीही ते इच्छूक असलेल्या विषय समितीच्या सभापतीचा पदभार सांभाळलेला असल्याने, त्यांना पुन्हा तोच विभाग पाहिजे होता. त्यावर ते आग्रही होते. मात्र त्यांचा हा आग्रह पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांना अमान्य होता.त्यामुळे रात्रीतूनच चक्रे फिरली. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचीही फोनाफानी झाली...अन ज्यांचे संभाव्य सभापती म्हणून नाव निश्चित झाले होते, त्यांच्या नावावर ‘फुली’ मारण्यात येऊन दुसºया एका अनुभवी सदस्यालाच सभापतीपदाची संधी देण्याचे निश्चित झाले. केवळ एकाच विभागाचा आग्रह कायम ठेवल्याने, त्या सदस्याला पदाला मुकावे लागल्याची जोरदार चर्चा सुरू होती.दरम्यान याबाबत भाजपच्या काही पदाधिकाºयांशी या संदर्भात चर्चा केली असता, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याने त्यांनी सांगितले. मात्र घडलेल्या प्रकाराची जिल्हा परिषदेसह राजकीय क्षेत्रातही चर्चा सुरू आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ याचा अनुभव या सदस्याला आला.

टॅग्स :Dhuleधुळे