दहावी-बारावीच्या पेपर वेळेत बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:55+5:302021-04-06T04:34:55+5:30
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील बारावी व दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये ...

दहावी-बारावीच्या पेपर वेळेत बदल करा
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील बारावी व दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यावर्षी एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. राज्यभर एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान ४० अंश पेक्षा जास्त असते. प्रचंड उकाड्यात पेपर लिहिताना शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या नंबर गुणांवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत सकाळी लवकर परीक्षा घेणे आवश्यक आहे.
कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी व दहावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी लवकर म्हणजे सकाळी ८ वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करण्याची विनंती राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, प्र जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, विनोद रोकडे, खेमचंद पाकळे, जयवंत पाटील, सुधाकर पाटील, रावसाहेब चव्हाण, कैलास अमृतकर, मुश्ताक शेख, संजय पाटील, अमीन कुरेशी, किरण मासुळे, विजय सूर्यवंशी, कानिफनाथ सूर्यवंशी, दिलीप पाटील आदींनी केली आहे.