चंद्रकांत देसले यांना चौकशीअंती अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:52 IST2018-10-11T22:51:19+5:302018-10-11T22:52:16+5:30
ग़स़बँक गैरव्यवहार प्रकरण : सहकार क्षेत्रात खळबळ

चंद्रकांत देसले यांना चौकशीअंती अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील ग़ स़ बँकेचे गटनेते व विद्यमान चेअरमन चंद्रकांत देसले यांना बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात चौकशीअंती गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली़ त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़
५ कोटी ४९ लाख १८ हजार २०५ रुपयांचा गैरव्यवहार करून सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील ग.स. बॅँकेच्या संचालक मंडळासह अधिकारी मिळून एकूण ४६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता़ या दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयित चंद्रकांत देसले यांना चौकशीअंती गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी दिली़ या प्रकरणी विशेष लेखा परीक्षक वसंत राठोड यांनी फिर्याद दिली आहे़