फटाक्यांची आतषबाजी करून केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:27 IST2021-06-01T04:27:07+5:302021-06-01T04:27:07+5:30
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पंतप्रधान ...

फटाक्यांची आतषबाजी करून केंद्र सरकारचा निषेध
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाप्रणीत केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केले आहे. मोबदल्यात केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तूंची भाववाढ करून, महागाईचा भडका उडवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलचे दर शंभरी पार झाले, तसेच डिझेल, खाद्यतेल, गॅस सिलिंडर आदींच्या किमतीतही भयंकर वाढ झाली असल्याने, केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी सरपंच सोनीबाई गंगाराम भिल, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, उपसरपंच प्रतिनिधी अंजनकुमार पाटील, माजी सरपंच मधुकर पाटील, माजी सरपंच भटू पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, महेश पाटील, मनोहर पाटील, प्रा.दिनकर माळी, बापू महाराज, हिम्मत बोरसे, अशोक बोरसे, गंगाराम भिल, गुलजार माळी आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.