बोराडी येथे कोरोना जनजागृती करून बुद्ध पाैर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:06+5:302021-05-27T04:38:06+5:30

गौतम नगरात बुद्ध पौर्णिमा निमित्ताने बुद्ध उपासक व उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने उपसरपंच राहुल रंधे यांच्या हस्ते महाकारुणिक भगवान ...

Celebrating Buddha Parnima by raising awareness of Corona at Boradi | बोराडी येथे कोरोना जनजागृती करून बुद्ध पाैर्णिमा साजरी

बोराडी येथे कोरोना जनजागृती करून बुद्ध पाैर्णिमा साजरी

गौतम नगरात बुद्ध पौर्णिमा निमित्ताने बुद्ध उपासक व उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने उपसरपंच राहुल रंधे यांच्या हस्ते महाकारुणिक भगवान गौतम बुध्दांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच कोरोना जनजागृतीचे फलक घेऊन बुद्ध विहार ते बुद्ध स्तूपपर्यंत सर्व बुद्ध उपासक-उपासिका, बालमित्र व गौतमनगर परिसरातील महिला बचत गटाच्या महिला सभासदांनी शांततापूर्वक जनजागृती म्हणून शांती मार्च काढला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.यू. पवार, सी.एम. मोरे, टी.के. कुवर, जयराम कापुरे, सुभाष नाईक, दिनकर सत्तेसा, वासू सत्तेसा, गौतम सत्तेसा, विजय सत्तेसा, बंटी सत्तेसा, विश्वनाथ कुंवर, रमेश थोरात, सचिन वाघ, पंकज कापुरे, मंगेश इंदाई, अविनाश सत्तेसा, बालू बिराडे, रवी शिंदे, विशाल पवार, दादासाहेब नगराळे, सुभाष वाघ, संजय भदाणे, अक्षय गवळे, अशोक वाघ, सुनील थोरात, भैया शिरसाठ, सागर कुंवर, भोमा वाघ यांच्यासह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

Web Title: Celebrating Buddha Parnima by raising awareness of Corona at Boradi