भगवान महावीर यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:36 IST2021-04-27T04:36:40+5:302021-04-27T04:36:40+5:30
पिंपळनेर येथे रविवारी सकाळी महावीर भवन येथे महावीर जयंतीचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी जैन समाजाचे अध्यक्ष धनराज जैन, ...

भगवान महावीर यांची जयंती साजरी
पिंपळनेर
येथे रविवारी सकाळी महावीर भवन येथे महावीर जयंतीचा कार्यक्रम झाला.
या प्रसंगी जैन समाजाचे अध्यक्ष धनराज जैन, अध्यक्ष सुभाष जैन, जीवन खिंवसरा, प्रवीण गोगड, कुंदनमल गोगड, अनिल ओस्तवाल, कांतीलाल बाफना यांची उपस्थिती होती. प्रतिमा पूजन व नवकार मंत्राचा जप करण्यात आला.
बळसाणे
जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती रविवारी साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करीत जैन मंदिरात पुजाऱ्याने पूजा केली. गावातील शीतलनाथ संस्थानच्या भक्त निवासात भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले
बळसाण्याचे उपसरपंच महावीर जैन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभिवादन केले . गावातील जैन मंदिराचे पुजारी गिरीश जैन , मनिशंकर जैन तसेच येथील उपसरपंच महावीर जैन तसेच सामाजिक कार्यकर्ते गिरीश कोचर व परेश जैन आणि चेतन छाजेड , ललित कोचर उपस्थित होते.
म्हसदी
अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीरांची जयंती जैन बांधवांनी आपापल्या घरी साध्या पद्धतीने साजरी केली. येथील विनोद जैन व दीपक जैन यांनी कुटुंबीयांसोबत साजरी केली.