व्याख्यान, वृक्षारोपणासह साध्या पध्दतीने सीए दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST2021-07-02T04:24:53+5:302021-07-02T04:24:53+5:30
सी. दिनानिमित्ताने सकाळी गणेश कॉलनी, साक्री रोड, धुळे येथे हरियाली परिवाराच्या साहाय्याने वृक्षारोपण करण्यात आले. यात विविध प्रकारची सागवान ...

व्याख्यान, वृक्षारोपणासह साध्या पध्दतीने सीए दिन साजरा
सी. दिनानिमित्ताने सकाळी गणेश कॉलनी, साक्री रोड, धुळे येथे हरियाली परिवाराच्या साहाय्याने वृक्षारोपण करण्यात आले. यात विविध प्रकारची सागवान झाडे लावण्यात आली. यावेळी सी. संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुंडीयाल, सचिव रचेंद्र मुंदडा, माजी अध्यक्ष राजाराम कुलकर्णी आणि जयेश गौड तसेच राहुल मुंदडा, पवन अग्रवाल, शाम अग्रवाल, तुषार अग्रवाल, आनंद अग्रवाल, अमित गेराई उपस्थित होते. यानंतर छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सी. सभासदांसाठी सी. दिनानिमित्त घेत असलेल्या कार्यक्रमाची माहिती अध्यक्ष अविनाश घुंडीयाल यांनी दिली. मागील वर्षीच्या व्हर्च्युअल सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्यांना कमिटी सदस्यांसह माजी अध्यक्ष व वरिष्ठ सी. सदस्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमास माजी अध्यक्ष लोकेंद्र मुंदडा, व्ही. सी. अग्रवाल, मनोज डिसा, जयेश गौड आणि सर्व सी. उपस्थित होते.
यानंतर दुपारच्या सत्रात नाशिक सीए शाखे सोबत संयुक्त आभासी कार्यक्रमात सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष उत्तम प्रकाश अग्रवाल यांचे कोरोना नंतरचा सीए व्यवसाय व सीएची त्यातील भूमिका या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात धुळे सीए शाखेसह पश्चिम विभागातील एकूण ११ शाखेचे सीए सदस्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
कार्यक्रमात सर्व सदस्यांनी घरी एक झाड लावावे असे आवाहन करण्यात आली. आजच्या स्थितीत देश पातळीवर सीए इन्स्टिट्यूट मार्फत एक सीए सदस्य व एक विद्यार्थी एक झाड लावेल या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यात सीए सदस्य व विद्यार्थी मिळून देशभर १० लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धुळे सीए शाखा समितीचे अध्यक्ष अविनाश घुंडीयाल, उपाध्यक्ष निलेश के अग्रवाल, सचिव रचेंद्र मुंदडा, माजी अध्यक्ष निलेश जी अग्रवाल आणि राजाराम कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले़