धुळ्यात गोरक्षकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:36 IST2020-07-13T21:36:10+5:302020-07-13T21:36:34+5:30
कत्तलखाने बंद करा : वाहनांच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

dhule
धुळे : वाहने तोडफोड प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास नकार दिल्याने गोरक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात आमरण उपोषण सुरू केले आहे़
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला संजय शर्मा आणि राकेश लगडे यांच्या वाहनांची समाजकंटकांनी तोडफोड केली़ या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे सादर करुन देखील पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही़ त्यामुळे संजय शर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात आमरण उपोषण सुरू केले आहे़ तर शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे कार्यकर्ते तसेच अन्य समर्थक साखळी उपोषणाला बसले आहेत़
धुळे शहरातील गोहत्या बंद करावी, ४८ कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करावे, गोहत्या करणाऱ्यांसह त्यांना सहकार्य करणाºया पोलिसांवर कठोर कारवाई करावी, गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, गोरक्षकांच्या संपत्तीची नासधूस करणाºया समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावे आदी मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे़
उपोषण स्थळी विकास सुधाकर गोमसाळे, सचिन शरदचंद्र चिंगरे, कुणाल रविकांत घाटोळ, कुणाल वाल्मिक बोरसे, हर्षल शिवाजीराव गवळी, विनोद दिपक शर्मा, आशिष काशिनाथ महाजन, धनेश संजय शर्मा, विनोद मोहन लहामगे, गोपाल सुधाकर गोमसाळे, प्रितेश ओसवाल, रोहित सोनार, योगेश बागुल, संतोष लगडे, सुरज घनश्याम शर्मा, विनय अनिल शर्मा आदी उपस्थित होते़
जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी दोन जण आले होते़