पथविक्रेत्यांना आता कॅशबॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:02+5:302021-01-13T05:34:02+5:30
केंद्र शासनाच्या पंतप्रधान आत्मनिर्भर पथविक्रेता निधी अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पथविक्रेत्यांना १० हजार रुपये अनुदान दिले जाणार ...

पथविक्रेत्यांना आता कॅशबॅक
केंद्र शासनाच्या पंतप्रधान आत्मनिर्भर पथविक्रेता निधी अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पथविक्रेत्यांना १० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. यात डिजिटल व्यवहार करणाऱ्यास बाराशे रुपयापर्यंत कॅशबॅक दिले जाणार आहे. डिजिटल व्यवहार करण्यासाठी बॅकेने दिलेल्या क्युआर कोडने, भीम ॲपने, पेटीएम आदी साधनांचा वापर करता येऊ शकतो. यासाठी पथविक्रेत्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक लाभार्थांना बॅंकेत दिले जात आहे.
शनिवारी शहरातील पुष्पांजली मार्केटमधील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत संबधित कर्ज घेतलेल्या लाभार्थांला डिजिटल व्यवहाराने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अभियानात नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी बॅंकेचे व्यवस्थापक मनाेज काळे यांनी प्रात्याक्षिक करून दाखविले.
मनपा सहायक आयुक्त पल्लवी शिरसाठ शहरातील पथविक्रेत्यांनी या अभियानात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले.