धुळ्यात कार दुचाकी अपघात, महिला जागीच गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:06 IST2018-04-17T13:06:01+5:302018-04-17T13:06:01+5:30
मालेगाव रोडवरील घटना : एक गंभीर जखमी

धुळ्यात कार दुचाकी अपघात, महिला जागीच गतप्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दुचाकी चालविताना अचानक कार खाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला़ तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून माहिती घेण्याचे काम सुरु आहे़
शहरातील मालेगाव रोडवरील यल्लमा मातेच्या मंदिराजवळ अपघाताची ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ दुचाकीने जात असताना अचानक तोल गेल्याने दुचाकी आणि कारचा अपघात झाला़ कारच्या चाकाखाली महिला आल्याने तिला गंभीर दुखापत झाली़ यात तिचा मृत्यू झाला़ तर गंभीर पुरुषाला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़
दरम्यान, घटनास्थळी गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत़ माहिती घेण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते़ त्यामुळे मयत महिला आणि गंभीर असलेल्या पुरुषाचे नाव समजू शकलेले नाही़ पोलिसांचा तपास सुरु आहे़