जिल्ह्यात 7 हजार 425 लिटर लस साठविण्याची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:24 IST2020-12-14T11:24:38+5:302020-12-14T11:24:54+5:30
धुळे : : कोरोनाच्या लसीची चाचणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. नवीन वर्षात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ...

dhule
धुळे : : कोरोनाच्या लसीची चाचणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. नवीन वर्षात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील नऊ हजार १९४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. तसेच सात हजार ४२५ लीटर लस साठवण्याची क्षमता आहे.
भारतातील तीन कंपन्यांमध्ये कोरोना लसीची निर्मिती होत आहे. त्यात भारत बायोटेक, सीरम आदी कंपन्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी मार्च - एप्रिल महिन्यात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यात, शासकीय क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे.
शितगृहांची जय्यत तयारी
जिल्ह्यात सात हजार ४२५ लीटर लस साठवण्याची क्षमता आहे. लस साठवण्यासाठी आवश्यक शीतगृहे उपलब्ध आहेत. आयएलआर व डीपफ्रीजर अशा दोन प्रकारच्या शीतगृहांमध्ये लस ठेवता येते. जिल्ह्यात आयएलआर या प्रकारातील ५९ व डीपफ्रीझर या प्रकारातील ६० शीतगृहे उपलब्ध आहेत.