बोरपाणी शिवारातील गांजाची शेती उध्दवस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 13:06 IST2020-12-15T13:06:04+5:302020-12-15T13:06:24+5:30
५२ हजार रुपयांची २६ किलो गांंजाची झाडे जप्त

बोरपाणी शिवारातील गांजाची शेती उध्दवस्त
बोराडी : शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथे तालुका पोलिसांनी गांजाची शेती उद्धवस्त करीत ५२ हजार रुपये किंमतीचा २६ किलो वजनाचे गांजाची झाडे जप्त केली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शिरपूर तालुक्यातील बोरपाणी गांवाचे शिवारात संभा वालजी पवार यांच्या शेतात रविवारी सायंकाळी ४:३० वाजता छापा टाकला. सदर शेतात इतर पिकाच्या आडोश्याला अवैध रित्या गांजा या अंमली पदाथार्ची वनस्पतींचे विक्रीच्या उददेशाने वाढवली असल्याचे आढळुन आले. सदर कार्यवाहीत साडे ५२ हजार रुपये किमतीचा २६ किलो वजनाचे ४ ते ८ फूट उंच वाढलेले गांजा वनस्पतीचे झाडे जप्त केली असून आरोपी शेतमालक संभा वालजी पावरा हा पोलिसांना पाहून घटनास्थळा वरून फरार झाला. त्याच्या विरुध्द शिरपुर तालुका पोलीस कर्मचारी संदीप शिंदे यांनी दिलेल्या फियार्दीवरुन एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हयाचा पुढील तपास पीएसआय दीपक वारे हे करीत आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर अनिल माने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक पाटील, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, दिपक वारे तसेच जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस कर्मचारी व सांगवी पोलीस कर्मचारी यांनी केली.