अडचणीवर मात करीत मोहीम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:23 IST2020-07-25T22:22:51+5:302020-07-25T22:23:28+5:30
संडे अँकर । जवाहर मेडीकल फाऊंडेशनकडील रस्ता तुटल्याने आपत्ती प्रतिसाद दल सक्रीय

अडचणीवर मात करीत मोहीम यशस्वी
धुळे : मुसळधार झालेल्या पावसामुळे साक्री रोडवरील जवाहर मेडीकल फाऊंडेशनकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने सर्वांचेच हाल झाले़ यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीने तातडीने येऊन मदतकार्य सुरु केले़ तातडीने हालचाली गतीमान करुन पायी जाणाऱ्यांची सोय करुन दिली़
धुळे शहरात २५ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला़ साक्री रोडवरील जवाहर मेडीकल फाऊंडेशनकडे जाणाºया रस्त्यावर शुक्रवारी सकाळी पाणी आल्याने पुन्हा एकदा एसीपीएम महाविद्यालय आणि रुग्णालयाचा शहराशी असलेला संपर्क तुटला़ या आधी साधारण १५ ते २० दिवसांपुर्वी नकाणे तलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी रस्त्यावर आल्याने जवाहर मेडीकलचा संपर्क तुटला होता़ परिणामी संपर्कच तुटल्याने दिवसभर सर्वांचे हालच झाले़ डॉक्टरांसह सर्वांना देखील रुग्णालयात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले होते़
अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, नियंत्रण कक्ष मुंबई यांच्याकडून आदेश आल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद धुळे येथील पथकाने मदतकार्याला सुरुवात केली़ अडकलेल्या सर्वांना बाहेर काढत पायी जाणाऱ्यांसाठी सोय केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले़
समादेशक यांचे मिळाले मार्गदर्शन
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे समादेशक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहायक समादेशक बी़ आऱ चत्रे यांनी ही मोहीम यशस्वी केली़ त्यांना पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्यासह ३ पोलीस अधिकारी आणि २६ पोलीस कर्मचारी असे एक संपूर्ण पथक यांची मदत मिळाली़ त्यांना शोध आणि बचाव कार्यासाठी पाठविण्यात आले होते़ परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आपले मदत कार्य केले़