अभियान यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत : पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST2021-08-21T04:41:12+5:302021-08-21T04:41:12+5:30
म्हसदी, ता. साक्री येथील धनदाईदेवी मंदिरात साक्री पंचायत समितीच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे माझी वसुंधरा अभियान टप्पा दोनचे ...

अभियान यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत : पवार
म्हसदी, ता. साक्री येथील धनदाईदेवी मंदिरात साक्री पंचायत समितीच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे माझी वसुंधरा अभियान टप्पा दोनचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शैलेजा देवरे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अशोक कुमार, पंचायत समितीचे माजी सदस्य राजधर देसले, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गंगाराम देवरे, एस.टी. महामंडळाचे निवृत्त विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, वृक्षमित्र सुभान पिंजारी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, अभियानाच्या टप्पा- २ मध्ये काही बदल अपेक्षित आहेत, ते लवकरच उपलब्ध होतील. यावेळी जिल्ह्यात दहा हजारांवरील व दहा हजारांच्या खालील लोकसंख्या असलेल्या व ऐच्छिक सहभाग असलेल्या २३ ग्रामपंचायतींचा या अभियानात सहभाग नोंदविण्यात आला आहे. त्यापैकी साक्री तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींचा सहभाग असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर माझी वसुंधरा या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवा, त्यातून जास्तीत जास्त गुण मिळवा, मात्र यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांनी सांगितले. नेहरू युवा केंद्राचे अशोक कुमार यांनी नेहरू युवा केंद्र विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी निजामपूर जैताणे येथील ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड यांनी, गेल्यावेळी आमची ग्रामपंचायत मागे पडल्यामुळे यश मिळू शकले नाही त्यामुळे स्वच्छतेवर भर द्या, वृक्षलागवड करा असे आवाहन केले. त्यानंतर अध्यक्ष तथा सरपंच शैलेजा देवरे यांनी, जलसंवर्धन व वृक्षलागवड या कार्यक्रमात ग्रामपंचायत नेहमीच अग्रेसर आहे. पुढील काळात ओला व सुका कचऱ्याचा प्रकल्प, पाणी अडवा पाणी जिरवा असे विविध कार्यक्रम ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येतील, असे सांगितले. प्रारंभी ग्रामसेवक मेघश्याम बोरसे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विस्तार अधिकारी जे. पी. खाडे, एस. ओ. जाधव, पी. एस. महाले, एस. एस.भामरे, जिल्हा कक्षातील मूल्यमापन सनियंत्रण सल्लागार वैभव सयाजी, जवळ मनुष्यबळ विकास सल्लागार दीपक देसले, पाणी गुणवत्तातज्ज्ञ विजय हेलिंगराव यांच्यासह पिंपळनेर, सामोडे, जैताने, कासारे, दुसाने, निजामपूर, म्हसदी, सुकापूर, पानखेडा, चिपलीपाडा, म्हसाळे, ब्राह्मणवेल, उभरांडी, मलांजन, लोणखेडी येथील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र देवरे, किरण देवरे, प्यारेलाल मन्सुरी, विजय देवरे, अशोक मोहिते, विष्णू गायकवाड, सुंदराबाई देवरे, प्रतिभा देवरे, ज्योतीबाई ठाकरे, रेखाबाई सोनवणे, सुनील पवार, रत्नाकर बागुल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे रवींद्र देवरे, भूषण चव्हाण, सतीश देवरे, प्रकाश खैरनार, सचिन मोहिते, सिद्धार्थ मोहिते, प्रवीण देवरे, विजय देवरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी उपस्थितांना हरित शपथ दिली व गाव प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले.
200821\img-20210813-wa0038.jpg
फोटो