किरायेदार म्हणून आले, घरमालक समजू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:40+5:302021-07-07T04:44:40+5:30
मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ऑनलाईन झाल्याने तसेच घरमालकांसह भाडेकरूंमध्येदेखील कायद्यांबाबत जागृती झाल्याने, या क्षेत्रातील गुन्हेगारी कमी झाल्याने घरे बळकावण्याचे प्रकार ...

किरायेदार म्हणून आले, घरमालक समजू लागले
मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ऑनलाईन झाल्याने तसेच घरमालकांसह भाडेकरूंमध्येदेखील कायद्यांबाबत जागृती झाल्याने, या क्षेत्रातील गुन्हेगारी कमी झाल्याने घरे बळकावण्याचे प्रकार पूर्वीपेक्षा कमी झाले आहेत. परंतु, काही भाडेकरू किरायेदार म्हणून येतात आणि स्वत:ला घरमालक समजू लागतात, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.
नोकरी तसेच कामानिमित्त शहरात येणाऱ्या चाकरमान्यांना, कामगारांना राहण्यासाठी भाडेतत्त्वाच्या घराची आवश्यकता असते. घरमालकांनी पूर्ण खात्री केल्याशिवाय घर भाड्याने देऊ नये. नियमानुसार करारनामा करावा. तसेच भाडेकरूची माहिती आपल्या पोलीस ठाण्यात सादर करावी. - चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक
घर भाड्याने देताना, ही घ्या काळजी
n घर भाडेतत्त्वाने देताना काळजी घेणे आवश्यक आहे. ओळखीच्या व्यक्तीला घर द्यावे.
n कितीही जवळचे संबंध असले तरी नियमानुसार घरभाडे करारनामा करावा.
n भाडेकरूची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन नोंदवावी. सोबत करारनामा जोडावा.