वर्षानंतर धुळे मध्यवर्ती बसस्थानकात मध्य प्रदेशच्या बसेसला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:28 IST2019-11-05T11:27:59+5:302019-11-05T11:28:17+5:30
वाहतुकीची कोंडी होत असल्याने, देवपूर बसस्थानकातून गाड्या सोडण्याचे दिले होते आदेश

वर्षानंतर धुळे मध्यवर्ती बसस्थानकात मध्य प्रदेशच्या बसेसला परवानगी
आॅनलाइन लोकमत
धुळे : वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन येथील मध्यवर्ती बसस्थानकात मध्यप्रदेश परिवहनच्या बसगाड्यांना नोव्हेंबर २०१८ पासून प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र मुंबई येथील सेंट्रल कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर पुन्हा मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्यात आलेला आहे.
धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानात दररोज ११०० बसगाड्या येतात व जातात. तसेच दिवाळी व इतर सणाच्या काळात बस फेऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असते. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. परिणामी रस्त्यावर बसगाड्यांची रांग लागत असातत. या स्थानकात होणारी वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी इंदूर, भोपाळसह मध्यप्रदेशच्या इतर भागात जाणाºया तसेच इंदूरहून धुळे, पुणे, शिर्डी, नाशिक, या गावांकडे जाणाºया महाराष्टÑ व मध्यप्रदेशच्या बसेस धुळे मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी देवपूर बसस्थानकातून सुटतील असे आदेश विभाग नियंत्रकांनी काढले होते.
मध्यवर्ती बसस्थानकात गाडी आणण्यास मध्यप्रदेशच्या बसेसला परवानगी नसल्याने, या गाड्या स्थानकाबाहेर उभ्या राहत होत्या. त्या बसेसचे चालक-वाहक आगारात येऊन प्रवाशी घेऊन जात होते. या बसेस रसत्यावर उभ्या राहत असल्याने, वाहतुकीचीही कोंडी होत होती. मध्यंतरी मध्यप्रदेशची बस मध्यवर्ती स्थानकात आणल्याच्या कारणावरून येथील कर्मचाऱ्यांशी वादही झाला होता.
दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश मिळत नसल्याने, तेथील संघटनेने याबाबत मुंबईच्या सेंट्रल कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीबद्दल सेंट्रल कार्यालयाने धुळे विभागाच्या अधिकाºयांना कुठलीही विचारणा न करता, तसेच बसस्थानकात होणारी कोंडी लक्षात न घेता, मध्यप्रदेशच्या बसगाड्यांनाही मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्याचा आदेश दिला असल्याचे समोर आले आहे. आम्हाला कुठलेही स्पष्टीकरण करण्याची संधीच मिळाली नाही, असे धुळे विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे.
दरम्यान २७ आॅक्टोबरपासून मध्यप्रदेशच्या बसगाड्या मध्यवर्ती बसस्थानकात पूर्ववत येऊ लागल्या आहेत.