बस-पिकअप व्हॅन समोरासमोर धडकल्या; बोराडी-नांदर्डे दरम्यानची घटना; चारजण जखमी

By अतुल जोशी | Updated: February 7, 2024 22:23 IST2024-02-07T22:23:00+5:302024-02-07T22:23:48+5:30

धडक एवढी जोरात होती की बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. पिकअप व्हॅनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Bus-pickup vans collided head-on; Incident between Borradi-Nandarde; Four injured | बस-पिकअप व्हॅन समोरासमोर धडकल्या; बोराडी-नांदर्डे दरम्यानची घटना; चारजण जखमी

बस-पिकअप व्हॅन समोरासमोर धडकल्या; बोराडी-नांदर्डे दरम्यानची घटना; चारजण जखमी

धुळे : बस आणि पिकअप व्हॅन यांच्यात समोरासमोर धडक होऊन या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालेला आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नांदर्डे नर्सरी ते बोराडी घाटी या दरम्यान झाला.

शिरपूर आगाराची बस (क्र. एमएच २० बीएल ०६९९) शिरपूर येथून पानसेमलकडे जाण्यासाठी शिरपूर आगारातून निघाली होती. त्याचवेळी बोरोडीकडून दूध घेऊन निघालेली पिकअप व्हॅन (क्र. एमएच १८-एए ६४४१) यांच्यात बोराडी घाटात समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक एवढी जोरात होती की बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. पिकअप व्हॅनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात बसचालक वाडी येथील शरद सैंदाणे, वाहक के.बी. कोळी व यांच्यासह पिकअप व्हॅनचे चालक, क्लिनर हे गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला वाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Bus-pickup vans collided head-on; Incident between Borradi-Nandarde; Four injured

टॅग्स :Accidentअपघात