घरफोडीत दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 22:30 IST2019-10-10T22:29:51+5:302019-10-10T22:30:12+5:30
साक्री रोडवरील घटना

घरफोडीत दागिने लंपास
धुळे : साक्री रोडवरील गुरुकूल हायस्कूल जवळ चोरट्याने डल्ला मारत बंद घर फोडले़ यात दागिने आणि रोकड लांबविल्याची घटना गुरुवारी उजेडात आली़
सुमनबाई मोरे या बाहेर गावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते़ याचा फायदा चोरट्याने घेतला आणि कपाट ठेवलेले ३० हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा दीड ते दोन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे़ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते़