घरफोडीच्या गुन्ह्यातील टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:55+5:302021-06-03T04:25:55+5:30
धुळे : घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरांच्या टोळीचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात छडा लावला असून ७ संशयिताना गजाआड केले आहे. ...

घरफोडीच्या गुन्ह्यातील टोळी गजाआड
धुळे : घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरांच्या टोळीचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात छडा लावला असून ७ संशयिताना गजाआड केले आहे. या टोळीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली आणि कंपाऊंडची तार हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, मोघण, ता. धुळे शिवारात २३ मे रोजी रात्री नीलेश अशोक नानकर यांच्या गोडावूनमधून ६३ हजार रुपये किमतीचे कंपाऊंडच्या तारेचे २१ बंडल चोरीला गेले होते. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी रोशन ऊर्फ पप्या गणेश पाटील (१८, रा. मोघण) या संशयिताला अटक केली. त्याने या घरफोडीसह साथीदारांच्या नावाचीदेखील कबुली दिली. त्यानुसार जनार्दन ऊर्फ नानू प्रमोद पाटील (२०), राकेश निंबा माळी (२३), शुभम निंबा माळी, चंद्रशेखर पंढरीनाथ माळी चाैघे रा. मोघण, तुषार गोरख जाधव-कोळी (२३, रा. हेंद्रूण ता. धुळे), अक्षय (रा. बहाळ, ता. चाळीसगाव) या सहा जणांना पोलिसानी पकडले.
या टोळीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली आणि ४८ हजार रुपये किमतीचे तारेचे बंडल असा एकूण ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू, उपनिरीक्षक मिर्झा, हेड काॅन्स्टेबल आर. एस. दराडे, श्याम काळे, अजय दाभाडे, गणेश भामरे, सचिन वाघ, जितेंद्र वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास हेड काॅन्स्टेबल आर.एस. दराडे करीत आहेत.