शिरपूरला शिसाकासाठी शेतकºयांचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:30 IST2018-05-15T22:30:42+5:302018-05-15T22:30:42+5:30

१२ किमी होते अंतर : मोर्चेकरांना पोलिसांनी थांबविल्याने उडाला गोंधळ

A bullock cart for farmers of Shirakpur village | शिरपूरला शिसाकासाठी शेतकºयांचा बैलगाडी मोर्चा

शिरपूरला शिसाकासाठी शेतकºयांचा बैलगाडी मोर्चा

ठळक मुद्देमोर्चेकरी वाडी येथे पोहचल्यानंतर चेअरमन माधव पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर मोर्चेकºयांना पोलिसांनी थांबविले़ त्यावेळी अर्धातास गोंधळ सुरू होता़ चेअरमनच्या घरापर्यंत मोर्चा नेवू द्यावा अशी भूमिका मोर्चेकरांनी घेतल्यानंतर वातावरण तंग झाले़ चेअरमन पाटील यांच्या घरासमोर बंदोबस्त होता़

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद आहे, तो सुरू व्हावा; या मागणीसाठी शिसाका चेअरमन राहत असलेले १२ किमी अंतरावरील वाडी गावापर्यंत सर्वपक्षीय १० बैलगाड्या असलेला मोर्चा वाजत-गाजत मंगळवारी दुपारी काढण्यात आला़ दरम्यान, मोर्चकºयांना चेअरमन यांच्या घराजवळ  पोलिसांनी अडविल्यामुळे तेथे अर्धा तास गोंधळ झाला होता. 
शहरातील बाबुराव वैद्य मार्केटपासून मोर्चा दुपारी ४ वाजता सुरूवात झाली़ मोर्चा मेनरोड मार्गाने पाचकंदिल चौक, वाघाडीमार्गे वाडी येथे राहत असलेले कारखान्याचे चेअरमन माधव आनंदराव पाटील यांच्या गावापर्यंत काढण्यात आला़   
मोर्चात भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, तालुका प्रभारी डॉ़ जितेंद्र ठाकूर, दिलीप लोहार, अशोक श्रीराम, अ‍ॅडग़ोपाल राजपूत, मोहन पाटील, नगरसेवक राजेंद्र गिरासे,    मयूर राजपूत, अ‍ॅड़ अमित जैन, नगरसेवक रोहित रंधे, सेनेचे भरतसिंग राजपूत, राजू टेलर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, ईश्वर बोरसे, मिलिंद पाटील, अरूण धोबी, प्रमोद पटेल, चेतन पाटील यांच्यासह शेतकरी विकास फाऊंडेशन, युवा शेतकरी मंच, ऊस उत्पादक व कामगार आदी सहभागी झाले होते़  
डॉ़ जितेंद्र ठाकूर यांनी गेल्या ६ वर्षापासून साखर कारखाना बंद आहे़ केवळ २६ कोटी रूपयांसाठी कारखाना बंद राहतो, हे दुर्दैव आहे़ आता मात्र २ कोटी रूपये देवू अशी वल्गना त्यांच्याकडून केली जात आहे़ यावेळी अ‍ॅड़अमित जैन, राहुल रंधे व तुषार रंधे, अशोक श्रीराम यांनीही मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड़ गोपाल राजपूत यांनी मोर्चेच्या उद्देशाबाबत माहिती दिली़ 

Web Title: A bullock cart for farmers of Shirakpur village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.