राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत खेळाडुंना कांस्यपदक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:55 IST2018-12-11T21:55:03+5:302018-12-11T21:55:37+5:30

जो़रा़सिटी हायस्कुलचे यश: दोन विद्यार्थींची निवड 

Bronze medalists at the state level gymnastics tournament | राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत खेळाडुंना कांस्यपदक 

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सांगली येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत शालेय राज्यस्तर जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत जो़रा़सिटी विद्यालयाचे स्वरदा संजय वाघ व दुर्गेश संजय देवरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून कांस्यपदक पदकावले़
या स्पर्धेसाठी स्वरदा संजय वाघ हिने जिल्हा क्रीडा संकुल येथील जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केद्रात सराव केला होता़ तर दर्गेश देवरे यांने जो़ रा़ सिंटी हायस्कुल येथील जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रात सराव केला होता़ त्यांच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक जगदीश राजेशिर्के, आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू व छत्रपती पुरस्कार प्राप्त सिध्दार्थ कदम, परवेज शेख, जिल्हा अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र महाले, चेतन मंडोरे, सुनिल चौधरी, राजेेंद्र वारे, भूपेंद्र मालपुरे, संतोष जोशी, अतुल पेडवाल, जितेंद्र पाटील, आनंद पवार, वासंती जोशी, प्रविण ढगे यांनी कौतुुक केले आहे़ 

Web Title: Bronze medalists at the state level gymnastics tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे