पैशांच्या वादातून ब्रोकरला मारहाण, धुळ्यातील चाळीसगाव रोडवरील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: April 6, 2023 19:53 IST2023-04-06T19:53:17+5:302023-04-06T19:53:35+5:30

दोन जणांशी त्यांचा प्लॉटशी संबंधित व्यवहार सुरू होता.

Broker beaten up due to money dispute, incident on Chalisgaon Road in Dhule | पैशांच्या वादातून ब्रोकरला मारहाण, धुळ्यातील चाळीसगाव रोडवरील घटना

पैशांच्या वादातून ब्रोकरला मारहाण, धुळ्यातील चाळीसगाव रोडवरील घटना

धुळे : पैशांच्या वादातून ब्रोकर तरुणाला दोन जणांनी मारहाण केल्याची घटना धुळ्यातील चाळीसगाव रोड भागात बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शाह सत्तार सईद शाह (वय ३३) या ब्रोकरने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दोन जणांशी त्यांचा प्लॉटशी संबंधित व्यवहार सुरू होता.

त्याच्यावरून त्यांच्यात पैशांची देवाण-घेवाण देखील झाली. या कारणावरून त्यांच्यात वाद झाले. वाद विकोपाला गेल्याने त्या दोघांनी शिवीगाळ करत शाह सत्तार यांना हाताबुक्क्याने मारहाण केली. डोक्यात दगड टाकून त्यांचे डोकेही फोडले. ही घटना चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटलजवळ बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाण केल्यानंतर या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर जखमी अवस्थेत शाह सत्तार यांनीही रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन चाळीसगाव रोड पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास हेकॉ चौधरी करीत आहेत.

Web Title: Broker beaten up due to money dispute, incident on Chalisgaon Road in Dhule