पांझरा नदीपात्रात मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 22:21 IST2019-10-17T22:21:16+5:302019-10-17T22:21:57+5:30
वरखेडी शिवार, अकस्मात मृत्यूची नोेंद

पांझरा नदीपात्रात मृतदेह आढळला
धुळे : पांझरा नदीच्या पात्रात एका प्रौढाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची घटना धुळे तालुक्यातील वरखेडी गावाच्या शिवारात आढळून आला़ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़
धुळे तालुक्यातील वरखेडी येथील गुलाब पांडूरंग माळी (४५) हे बुधवारी सकाळी ८ वाजेपासून वरखेडी शिवारात म्हशी चारण्यास गेले होते़ दुपारी २ वाजेच्या सुमारास वरखेडी शिवारातील जुन्या गाव दरवाजासमोर पांझरा नदीच्या पात्रात माळी हे बेशुध्दावस्थेत आढळून आले़ घटना लक्षात येताच त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ डॉ़ शिवराम पावरा यांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास माळी यांना मृत घोषीत केले़ याप्रकरणाची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहायक पोलीस उपनिरीक्षक ए़ एऩ देवरे घटनेचा तपास करीत आहेत़