पिंप्री शिवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, खुनाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 21:36 IST2020-12-18T21:35:49+5:302020-12-18T21:36:11+5:30

माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस दाखल, पोलिसात नोंद

The body of an unidentified Isma was found in Pimpri Shivara on suspicion of murder | पिंप्री शिवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, खुनाचा संशय

पिंप्री शिवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, खुनाचा संशय

धुळे : शहरालगतच्या पिंप्री शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली. त्याचा कोणीतरी खून केला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस दाखल झाले होते. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू झाला आहे.
शहरालगत पिंप्री गावातील काही लोकांना हा मृतदेह दिसून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्या इसमाला कोणीतरी मारून फेकले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील पिंप्री शिवारात हॉटेल सुल्तानियाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या माळरानावर एका नाल्यालगत अनोळखी इसम मृतावस्थेत पडला असल्याचे आढळून आले. काही प्रत्यक्षदर्शिनी याची माहिती गावात दिली. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत अनोळखी इसम हा ४५ ते ५० वयोगटातील आहे. पोलिसांना त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला असल्याचे दिसून आले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जबर मारहाण करून त्या इसमाला मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या अनोळखी इसमाच्या मृतदेहाचा पंचनामा पोलिसांनी केला. त्याला तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनेचा तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे करीत आहेत.

Web Title: The body of an unidentified Isma was found in Pimpri Shivara on suspicion of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे