मजुराचा मृतदेह आढळला पाण्याच्या टाकीत, घातपाताचा नातलगांचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST2021-02-17T04:43:01+5:302021-02-17T04:43:01+5:30

नकाणे रोडवरील किरण सोसायटीत एका ठिकाणी काम सुरू आहे. या ठिकाणी शकील शेख सिराज (४०, काझी प्लाॅट, नटराज चित्रपटगृहाजवळ, ...

The body of a laborer was found in a water tank | मजुराचा मृतदेह आढळला पाण्याच्या टाकीत, घातपाताचा नातलगांचा संशय

मजुराचा मृतदेह आढळला पाण्याच्या टाकीत, घातपाताचा नातलगांचा संशय

नकाणे रोडवरील किरण सोसायटीत एका ठिकाणी काम सुरू आहे. या ठिकाणी शकील शेख सिराज (४०, काझी प्लाॅट, नटराज चित्रपटगृहाजवळ, धुळे) हा काम करीत होता. रविवारी त्याने दोन सहकाऱ्यांसोबत काम केले. त्यानंतर तो बेपत्ता झाला. सोमवारी सकाळी पुन्हा बांधकामाला सुरुवात झाली. बांधकामासाठी पाणी घेण्याकरिता टाकीचे झाकण उघडल्यावर त्यात शकील शेख याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर शकीलच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. काही वेळातच त्याचे कुटुंबीय दाखल झाले. पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक सतीश गोराडे पथकासह दाखल झाले. शकीलचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याचा कोणीतरी घातपात केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे शकीलला कामावर नेणारा ठेकेदार आणि बांधकाम मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते. कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. पोलिसांनी समजूत काढूनही नातेवाईक समजून घेण्याच्या तयारीत नव्हते. अखेर उपअधीक्षक दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने सायंकाळी पांझरा नदीकिनारी असलेल्या अंजन शहा दर्गाजवळील कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली.

Web Title: The body of a laborer was found in a water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.