परिवहन मंडळाच्या १२२ कर्मचाऱ्यांची रक्तदाब तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:38 IST2019-11-19T11:37:42+5:302019-11-19T11:38:18+5:30
दोंडाईचा रोटरी क्लबचा उपक्रम : मधुमेहाची करण्यात आली चाचणी

Dhule
दोंडाईचा : येथील रोटरी क्लब मार्फत येथील राज्य परिवहन मंडळाच्या १२२ कर्मचाऱ्यांची रक्तदाब तपासणी व मधुमेह चाचणी करण्यात आली. जागतिक मधुमेह दिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रस्थानी असलेल्या रोटरी क्लब मार्फत राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाºयांची आरोग्याची काळजी घेत रक्तदाब तपासणी केली.
रोटरी क्लबचे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अध्यक्ष संजय निकम, सचिव डॉ.निलेशकुमार पवार, प्रोजेक्ट चेअरमन राकेश जयस्वाल, ओमप्रकाश अग्रवाल, डॉ.संतोष आव्हाड, डॉ.चेतन बच्छाव, डॉ.जितीन अग्रवाल, डॉ.सुभाष फुलंब्रिकर, डॉ.अविनाश मोरे, हर्षिद पटेल व रोटरी सदस्याचा दूरदृष्टीने व प्रयत्नाने सदर तपासणी मोफत करण्यात आली.
१२२ कर्मचाºयांपैकी ३० कर्मचाºयांना रक्तदाब व शुगर आढळून आली. त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
या वेळी आगार प्रमुख अनुराधा चौरे, भाबड आदी उपस्थित होते. रक्तदाब तपासणी व मधुमेह तपासणीमुळे कर्मचाºयात समाधान दिसले.