दारू पिण्यास पैसे न दिल्याने मुकटी येथे एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 12:55 IST2018-04-28T12:55:05+5:302018-04-28T12:55:05+5:30

धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, तीन संशयित ताब्यात

The blood of one of the murderers, due to non-payment of liquor, | दारू पिण्यास पैसे न दिल्याने मुकटी येथे एकाचा खून

दारू पिण्यास पैसे न दिल्याने मुकटी येथे एकाचा खून

ठळक मुद्देआरोपींनी दारूसाठी पैशांची केली मागणीमागणी पूर्ण न केल्याने वाद घातलाआरोपींनी कुºहाडीने वार करून एकास जखमी केले

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने, तालुक्यातील मुकटी येथे देवीदास नामदेव पवार (४७) याच्यावर कुºहाडीने वार करून, त्याचा खून करण्यात आला. मारहाणीत एकजण जखमी झाला.
 ही घटना २७ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मुकटी शिवारात घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयित आरोपी पियू पोपट दावलसे (भिल), राजू पोलत मोरे, महेंद्र माधवराव देवरे (सर्व रा.मुकटी) यांनी २७ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास देवीदास पवार व दगडू पुंडलिक मराठे (४८, रा. मुकटी) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने आरोपींनी पवार व मराठे यांच्याशी पिंपळकोठा रस्त्यावरील यशवंत ओंकार पाटील यांच्या खळ्याजवळ वाद घातला. दोघांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. वाद यावरच मिटला नाही. मराठे व पवार हे दोघेजण दगडू मराठे यांच्या शेतात गेले होते. त्याठिकाणी आरोपी पोहचले. त्यांनी मराठे यांच्या नाका, तोंडावर कुºहाडीने  वार करून जखमी केले. तर पवार हे शेतात झोपले असतांना, आरोपी पियू दावलसे याने  त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर कुºहाडीने वार करून, जीवे ठार मारले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, उपनिरीक्षक कादीर तडवी, विनोद वसावे, नवनाथ रसाळ, ओकांर गायकवाड, प्रकाश मोहने, सतिश कोठावदे, गोरख चौधरी, दिनेश मावची, सुनील पगारे, यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पियू दावलसे, राजू पोलत मोरे, महेंद्र माधवराव देवरे या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून लाकडीदांडा, कुºहाड, काठी ताब्यात घेतली आहे.
याप्रकरणी दगडू पुंडलिक मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशनला वरील तिघांविरूद्ध भादवि कलम ३०२, ३२४, ५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रसाळ करीत आहेत.


 

 

Web Title: The blood of one of the murderers, due to non-payment of liquor,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.