संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST2021-01-13T05:33:56+5:302021-01-13T05:33:56+5:30
संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुशिष्य स्मारक येथे प्रतिमा पूजनासह विविध कार्यक्रम होतील. तसेच तेली पंचायत भवनात कोरोना व्हायरस ...

संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान
संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुशिष्य स्मारक येथे प्रतिमा पूजनासह विविध कार्यक्रम होतील. तसेच तेली पंचायत भवनात कोरोना व्हायरस व संरक्षण याविषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर उद्या रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत तेली पंचायत भवनात तिळवण तेली समाज युवक मंडळातर्फे रक्तदान शिबिर होणार आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी १० वाजता गुरुशिष्य स्मारक येथे संत जगनाडे महाराज व तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन होईल. सकाळी ११ वाजता तेली पंचायत भवनात प्रतिमापूजन होणार आहे. या वेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमाबांडे, आमदार कुणाल पाटील, मंजुळा गावित, माजी आमदार अनिल गोटे, शरद पाटील, महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर मोहन नवले, जयश्री अहिरराव, कल्पना महाले, उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेनेचे अतुल सोनवणे, सभापती सुनील बैसाणे, रमेश श्रीखंडे, हेमंत साळुंखे, डॉ. सुशील महाजन, रणजितराजे भोसले, विनोद मित्तल, वाल्मीक दामोदर, संजय शर्मा, मनोज मोरे, संजय वाल्हे, दीपक खोपडे आदी उपस्थित असतील.