‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराला नेर गावात मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:31+5:302021-07-04T04:24:31+5:30
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती होती़ त्यानिमित्त धुळे ...

‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराला नेर गावात मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती होती़ त्यानिमित्त धुळे तालुक्यातील नेर गावात शनिवारी ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला़ नेर गावातील गांधी चौकात असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय आवारात सकाळी ९ वाजता शिबिराला सुरुवात करण्यात आली़ टप्प्याटप्प्याने ग्रामस्थांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती़ सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात ६१ दात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी करण्याचा प्रयत्न केला़
शिबिरात सरपंच गायत्री जयस्वाल, माजी सरपंच शंकरराव खलाणे, ग्रामपंचायत सदस्य सुमित जयस्वाल, माजी जि. प. सदस्य अजय माळी, दीपक खलाणे, राजेंद्र पाठक, राजधर अमृतसागर, संजय सैंदाणे, डॉ. सतीष बोढरे, डॉ. सुनील सोनवणे, साहेबराव सोनवणे, साहेबराव गवळे, अशोक बागुल, जाकीर तांबोळी, जुबेर तांबोळी, इम्तियाज पठाण, गुड्डू तांबोळी, एजाज तांबोळी, राकेश अहिरे, नीलेश एंडाईत, सतीष खलाणे, राहुल खलाणे, प्रशांत खलाणे, सुनील भागवत, नामदेव बोरसे, सोनू सोनवणे, किरण गवळे, धनराज धोबी, डॉ़ मोहन बोढरे, डॉ़ दिनेश नेरकर, दिलीप देशमुख, नाना कोळी, पंकज वाघ, नारायण बोढरे, योगेश गवळे, किरण गवळे, तानाजी शेलार, भूषण अहिरे, महेश माळी, आबा वाणी, संजय बोरसे, प्रकाश गवळे, प्रकाश खलाणे, आर. डी़ माळी, तुषार माळी, प्रकाशराव देशमुख, सुनील वाघ, गोरख वाघ, दीपक सोनवणे, राजेंद्र धनगर पाटील, दीपक मोरे, पंढरीनाथ शंकपाळ, उखडू भील, धनराज माळी, दद्दू जयस्वाल, दयाराम पाळधी, संजय शिंदे, रणजित शिंदे, रामू पाटील, विशाल निकुंभे आदी मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट दिली़