महारक्तदान शिबीरात ४२ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 21:51 IST2020-12-07T21:51:31+5:302020-12-07T21:51:52+5:30
शिरपूरला शिवसेनेचा उपक्रम

dhule
शिरपूर : राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाअंतर्गत तालुका शिवसेना-युवासेनेतर्फे शिवसेना कार्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात एकूण ४२ जणांनी रक्तदान केले. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतर्फे रविवारी शिरपूर येथे महारक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज गोरे, उपजिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुकाप्रमुख दीपक चोरमले, तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, शहरप्रमुख मनोज धनगर, मंगलसिंह भोई, प्रेम चौधरी, प्रमुख बंटी लांडगे, योगेश ठाकरे, देवाजी पाटील, दिनेश गुरव, जितेंद्र पाटील, अशोक मिस्री, पिंटू शिंदे, दीपक धनगर, अविनाश ठेलारी, विजय जोगराणा, गोरख कोळी, सागर कोळी, भूषण गोसावी, पुणेश बोरसे, सुकदेव बागुल, महिला आघाडीच्या वीणाताई वैद्य, अर्चना देसले, डॉ.शलाका तुपकरी, नीलेश सुराणे, अविनाश सूर्यवंशी, संजय चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.