जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे निर्विवाद बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 13:23 IST2020-01-08T13:23:17+5:302020-01-08T13:23:37+5:30

३१ जागा मिळविल्या : काँग्रेस ५ , राष्ट्रवादी २, सेना ३, अपक्ष २ जागा मिळविल्या

BJP's unanimous majority in Zilla Parishad elections | जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे निर्विवाद बहुमत

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे निर्विवाद बहुमत

धुळे : जिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे़ यात ५६ जागांपैकी ४३ जागांचा निकाल हाती आला आहे़ यात ३१ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब केला आहे़ यात शिरपूर तालुक्यात १०, शिंदखेडा तालुक्यात ८, साक्री तालुक्यात ३ आणि धुळे तालुक्यात १० याप्रमाणे ३१ जागांवर विजय संपादन केला़ तर, काँग्रेसने ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागा तर शिवसेनेने ३ जागा मिळविल्या आहे़ याशिवाय अपक्ष २ उमेदवार यात विजयी झाले आहे़ या निकालानंतर बहुमतांची २९ जागांची मॅजिक फिगर गाठून ३१ जागा मिळवत भाजपने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे़ उर्वरीत ठिकाणी मतमोजणी सुरु असून बहुतांश ठिकाणी भाजप आघाडीवर आहे़

Web Title: BJP's unanimous majority in Zilla Parishad elections

टॅग्स :Dhuleधुळे