शिंदखेडा पंचायत समितीवर भाजपची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:58 IST2020-01-08T12:56:57+5:302020-01-08T12:58:01+5:30

जिल्हा परिषद निवडणूक : १५ गणात वर्चस्व

BJP's power over the Shindkheda Panchayat Samiti | शिंदखेडा पंचायत समितीवर भाजपची सत्ता

शिंदखेडा पंचायत समितीवर भाजपची सत्ता

धुळे : शिंदखेडा तालुक्यात पंचायत समितीच्या २० पैकी १५ गणात विजयी मिळवित भाजपने पंचायत समितीवर एक हाती सत्ता मिळवित कमळ फुलविले.
शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ ,भडणे सेना, पाटण गणात काँग्रेस तर वारूळ गणात राष्ट्रवादी, असे आघाडीचे ४ उमेदवार विजयी झाले आहे. तर बेटावद गणात अपक्ष उमेदवार विजयी झाला. तर हातनूर, विखरण, मालपूर, निमगूळ, मेथी, खर्दे, धमाणे, विरदेल, होळ, नरडाणे, वालखेडा, खलाणे, चिमठाणे, शेवाडे, वर्षी अशा एकूण १५ गणात विजयी मिळवित पंचायत समितीत सत्ता काबीज केली आहे.

Web Title: BJP's power over the Shindkheda Panchayat Samiti

टॅग्स :Dhuleधुळे