शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

दुध दरवाढीसाठी भाजपचे महाएल्गार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 12:45 PM

जिल्हाभरात आंदोलन । धुळे, दोंडाईच्यात रास्तारोको, साक्री, निजामपूर, शिरपूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दुध दरवाढीच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी शनिवारी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाभरात महाएल्गार आंदोलन करण्यात आले. धुळ्यात रास्तारोको तर साक्री, निजामपूर, दोंडाईचा आदी ठिकाणी निदर्शने करण्यात आली.गायीच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे, दुध पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान तर दुध खरेदीचा हमीभाव ३० रुपये मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.शिरपूर- भाजपच्या वतीने शहरातील पित्रेश्वर कॉलनीच्या रिक्षा स्टॉपजवळ व वाघाडी येथे १ रोजी सकाळी निदर्शने करण्यात आली़यावेळी आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, जि.प. सदस्य देवेंद्र पाटील, माजी पं.स. उपसभापती दिपक गुजर, कृऊबा समिती संचालक अ‍ॅड.प्रतापराव पाटील, विजय पवार, भरत पाटील, देवेंद्र देशमुख, हिंमत राजपुत, सुरेंद राजपूत, महेंद्र पाटील, रोहित शेटे, सुनिल चौधरी, सतिष गुजर, हिरालाल कोळी, सुरेश भिल, बाळासाहेब पाटील, साहेबराव पाटील, अनिल गुजर, शामकांत पाटील, निलेश देशमुख, नरेश पवार, प्रशांत चौधरी, प्रशांत राजपुत, विक्की चौधरी, अविनाश शिंपी, नंदु माळी, रविंद्र पाटील, देवेंद्र राजपुत, श्रीकृष्ण शर्मा, मुबीन शेख, राधेश्याम चौधरी, शेखर माळी, भटु माळी, भिमा महाजन, सुनिल सोनवणे, किशोर कोळी, जिवन पवार, अनिल राजपुत, पप्पु राजपुत, रविंद्र सोनार, नंदु माळी, राजेश सोनवणे, राज सिसोदिया, पंडीत पाटील, दिनेश सोनवणे, यतिन सोनवणे, गणेश माळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.साक्री- साक्री तालुका भारतीय जनता पक्षातर्फे गोल्डी चौक येथे शनिवारी सकाळी महाएल्गार आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे साक्री तालुकाध्यक्ष वेणू सोनवणे, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस शैलेंद्र आजगे, शहराध्यक्ष कल्याण भोसले, प्रदीप नांद्रे, दीपक नांद्रे, राकेश आहिराव, योगेश चौधरी, गोविंदा सोनवणे, भवरे, हेमंत पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.निजामपूर- साक्री तालुक्यातील निजामपूर येथेही दुध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे मंडळ अध्यक्ष मोहन सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते, महेंद्र वाणी, अजितचंद्र शाह, संजय खैरनार, दगडु वाणी पाटील, वासुदेव बदामे, सतिष वाणी, मुकेश पाटील, युसूफ सैय्यद, तेजस जयस्वाल आदी उपस्थित होते.दोंडाईचा- दोंडाईचा-नंदुरबार चौफुलीवर शनिवारी सकाळी भाजपतर्फे दुधाच्या कॅन दाखवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, सरचिटणीस जितेंद्र गिरासे, पंकज चौधरी, कृष्णा नगराळे, बांधकाम सभापती निखिल जाधव, भरतरी ठाकूर, जितेंद्र गिरासे, ईश्वर धनगर, चिरंजीवी चौधरी, किशन दोधेजा, नरेंद्र कोळी, गिरधारी रूपचंदानी, अशोक चौधरी आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.धुळे- येथे भाजपतर्फे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, हिरामण गवळी, माजी महापौर जयश्री अहिरराव, नगरसेविका प्रतिभा चौधरी, रत्ना बडगुजर, भिकन वराडे, विजय पाच्छापूरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांना मोहाडी पोलिसांनी अटक करुन नंतर सुटका करण्यात आली.