शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला मित्रांचे मन वळवावे लागेल; काँग्रेसचा 'स्वबळ'चा नारा, तर ठाकरे सेना-मनसे युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 10:37 IST

वर्चस्वाची लढाई : भाजपचा ५५ प्लसचा नारा; महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा, उद्धवसेना, मनसे युतीचे संकेत, काँग्रेसचा स्वतंत्र लढा

चंद्रकांत सोनार लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : गत महापालिका निवडणूकीत तब्बल १५ वर्षाच्या इतिहासात ७४ पैकी ५२ जागा आपल्याकडे ओढून आणत सत्ता काबीज करण्यात भाजपला यश मिळविता आले. यंदा जागा वाटपावरून महायुतीत ही पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने आधीच स्वबळाचा नारा दिल्याने मविआतही बिघाडी होऊ शकते.

गेल्या निवडणूकीत राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती होती, परंतू जागा वाटपावरून धुळे महापालिकेची युती फिस्कटल्याने भाजपासह अन्य पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. त्यात भाजपने ७४ पैकी ५२ जागा मिळविल्या होत्या तर शिवसेनेला केवळ एकच जागेवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीतही भाजपाने ७४ पैकी दोघा मित्रपक्षाला १९ जागा देण्याचे कबुल केले आहे. परंतु, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट १९ जागा मान्य करणार नाही. त्यामुळे महायुती होईल, असे वाटत नाही.

मविआतही काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. पण मनसे आणि उद्धवसेनेत युती होण्याची शक्यता आहे. एमआयएम सुद्धा स्वतंत्र पणे लढणार आहे.

एकूण प्रभाग किती आहेत? - १९एकूण सदस्य संख्या किती? - ७४

कोणते मुद्दे निर्णायक?

१. मागील निवडणुकीत भाजपने दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच-सहा वर्षे उलटूनही शहराच्या अनेक भागांत ४ ते ८ दिवसांआड पाणी येते.२. कचरा संकलनासाठी खासगी ठेका देऊन ही शहरात आजही चौकाचौकात कचऱ्याचे ढीग दिसतात. नियोजनाचा अभावामुळे कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.३. भूमिगत गटार योजनेचे काम सहा वर्षापासून सुरू आहे. अद्यापही ते काम पूर्ण झालेले नाही.

आधी कुणाची होती सत्ता?

भाजप - ५०राष्ट्रवादी - ०८काँग्रेस - ०६एमआयएम - ०४समाजवादी - ०२बसपा - ०१शिवसेना - ०१लोकसंग्राम - ०१अपक्ष - ०१

मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?

एकूण - २६९५२८पुरुष - १,४०,१५५महिला - १,२९,३७३इतर - २५

आता एकूण किती मतदार ?

एकूण - ४,३०,३८७पुरुष - २,२१,७६५महिला - २,०८,५८०इतर - ४२

वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला होणार? : वाढीव मतदारांचा फायदा महायुतीला होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP faces alliance challenges; Congress goes solo; Sena-MNS unity hinted.

Web Summary : Dhule municipal elections see potential alliance shifts. BJP struggles with seat sharing in its coalition. Congress declares solo bid, while Sena and MNS may unite. Water issues and garbage disposal are key concerns for voters.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Dhule Municipal Corporation Electionधुळे महानगरपालिका निवडणूक २०२६