जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपची सत्तेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:17 IST2020-01-08T12:05:57+5:302020-01-08T12:17:58+5:30

१९ जागा मिळविल्या : काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २ तर शिवसेनेने १ जागा मिळविली

BJP is moving towards truth in the Zilla Parishad elections | जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपची सत्तेकडे वाटचाल

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपची सत्तेकडे वाटचाल

धुळे : जिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे़ यात ५६ जागांपैकी २५ जागांचा निकाल हाती आला आहे़ यात १९ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब लावला आहे़ यात शिरपूर तालुक्यात ७, शिंदखेडा तालुक्यात ८, साक्री तालुक्यात ३ आणि धुळे तालुक्यात १ याप्रमाणे १९ जागांवर विजय संपादन केला़ तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी २ जागा तर शिवसेनेने १ जागा मिळविली आहे़ याशिवाय अपक्ष १ उमेदवार यात विजयी झाला आहे़ उर्वरीत ठिकाणी मतमोजणी सुरु आहे़

Web Title: BJP is moving towards truth in the Zilla Parishad elections

टॅग्स :Dhuleधुळे