ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 18:04 IST2023-03-31T18:04:29+5:302023-03-31T18:04:46+5:30

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात गुरुवारी दुपारी घडली.

Bike rider killed in collision with truck, incident at Arvi Shivara in Dhule taluka | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील घटना

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील घटना

राजेंद्र शर्मा

धुळे : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

दूरसिंग रमेश दावर (वय ३२, रा. इंदापूर ता. राजपूर, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शालक अनिल ज्ञानसिंग चव्हाण (वय २६, रा. मंदवाडी ता. राजपूर, जि. बडवाणी) हा गुरुवारी दुपारी एमपी ४६ एमके ७९५८ क्रमांकाच्या दुचाकीने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून जात होता.

यावेळी आर्वी गावाच्या पुढे शनिमंदिराजवळ एमएच १९ सीवाय ५७०९ क्रमांकाच्या ट्रकची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात अनिल चव्हाण या तरुणाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो जागेवरच बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक कोठुडे घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Bike rider killed in collision with truck, incident at Arvi Shivara in Dhule taluka