कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गोदूर रोडवरील अपघात, एकजण जखमी
By अतुल जोशी | Updated: January 3, 2024 13:49 IST2024-01-03T13:48:09+5:302024-01-03T13:49:18+5:30
याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गोदूर रोडवरील अपघात, एकजण जखमी
अतुल जोशी, धुळे : भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण ठार तर एकजण जखमी झाला. हा अपघात २ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गोंदूर रोडवर झाला. अपघातात विलास प्रल्हाद पाटील (वय ३५) हे ठार झाले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विलास प्रल्हाद पाटील (वय ३५, रा. उभंड,पोस्ट वर्धाने, ता. साक्री) व राजेंद्र दशरथ पाटील (वय ४५, रा. उभंड) हे दोघे दुचाकीने (क्र.एमएच १८-एएच ४२६१) गोंदूर रोडने निमडाळे मार्गे उभंडकडे जात होते. त्याचवेळी धुळ्याकडून गोंदूरकडे येणाऱ्या कारने (क्र.एमएच ०४-एफआर ७३३१) दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात विलास पाटील यांना जबर मार लागल्याने, त्यांचा मृत्यू झाला. तर राजेंद्र पाटील हे जखमी झाले. याप्रकरणी अशोक पाटील (वय ६३, रा. उभंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॅान्स्टेबल सी. जी. नागरे करीत आहेत.