शेवाळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:46 IST2018-02-06T13:44:47+5:302018-02-06T13:46:52+5:30

विहिरीबाहेर काढून धुळ्याजवळील लळींग जंगलात सोडले 

Bibtasya Jeevan, lying in the well in Shewali | शेवाळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

शेवाळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

ठळक मुद्देरात्री अडीच वाजता विहिरीत पडलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यात यश रात्री अडीच वाजता विहिरीत पडलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यात यश मंगळवारी पहाटे बिबट्यास धुळ्याजवळील लळींगच्या जंगलात सोडले  

लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : तालुक्यातील शेवाळी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्यास अखेर बाहेर काढण्यात वनविभागाला रात्री दोन वाजेच्या सुमारास यश मिळाले. त्यास पिंजºयात ठेवण्यात आले असून अशा प्रकारे जीवदान मिळालेल्या या तीन वर्षीय बिबट्यास मंगळवारी पहाटे धुळे तालुक्यातील लळींगच्या जंगलात सोडण्यात आले. 
सोमवारी रात्री शेवाळी शिवारात गावापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडल्याचे स्पष्ट झाले. विहिरीतील मातीच्या कठड्याचा आधार घेत बिबट्या बसलेला होता. पाण्यात भिजल्याने तो थंडीने काकडला होता. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यात सहायक वनसंरक्षक रेवती कुलकर्णी यांच्यासह वनरक्षक भामरे, बोरसे, पाटील, वाघ, परदेशी, पठाण, खोंडे, बागुल आदींचा समावेश होता. ग्रामस्थही मोठ्या संख्येने  पोहचले होते. रात्रीची वेळ असल्याने विहिरीत अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशात लोखंडी पिंजरा आत सोडण्यात आला. महत्प्रयासानंतर  बिबट्या त्यात शिरला. त्या नंतर हा पिंजरा वर काढण्यात आला. तोपर्यंत रात्रीचे अडीच वाजले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या बिबट्यास धुळ्याजवळील लळींगच्या जंगलात सोडून देण्यात आले.

 

Web Title: Bibtasya Jeevan, lying in the well in Shewali