मूलभूत सेवा सुविधाअंतर्गत जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाजवळील रस्त्याचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:37+5:302021-02-05T08:44:37+5:30
धुळे : महानगरपालिकेतर्फे मूलभूत सेवा सुविधाअंतर्गत जवाहर फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाजवळील नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या स्लॅब क्लवर्ट बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री अब्दुल ...

मूलभूत सेवा सुविधाअंतर्गत जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाजवळील रस्त्याचे भूमिपूजन
धुळे : महानगरपालिकेतर्फे मूलभूत सेवा सुविधाअंतर्गत जवाहर फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाजवळील नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या स्लॅब क्लवर्ट बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी सकाळी झाले.
कार्यक्रमाला आ. कुणाल पाटील, आ. मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी आगामी काळात साक्री रोड ते हरणमाळ-नंदाभवानीपर्यंतचा साडेसहा किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आर्वी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन
पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते आर्वी, ता. जि. धुळे येथे विविध कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, सरपंच नागेश देवरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सत्तार म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी, गोरगरीब, शेतमजुरांचे विविध प्रश्न सोडविण्यात येतील. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणीसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून
प्रस्ताव सादर करावा. आ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे
यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ग्रामस्थ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिक महादू चौधरी यांना आदरांजली
स्वातंत्र्यसैनिक महादू मोतीलाल चौधरी यांचे निधन झाले. पालकमंत्री सत्तार यांनी स्वातंत्र्यसैनिक महादू चौधरी यांच्या जुने धुळ्यातील घरी जाऊन पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. स्वातंत्र्याच्या
युद्धात महादू चौधरी यांचे योगदान मोलाचे आहे. चौधरी कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे
पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनीही आदरांजली वाहिली.