जैताणे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:39+5:302021-06-18T04:25:39+5:30
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील ब यादीतील १०५ लाभार्थी आदिवासी, दुर्बल घटक, भूमिहीन ज्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी स्वतःची ...

जैताणे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील ब यादीतील १०५ लाभार्थी आदिवासी, दुर्बल घटक, भूमिहीन ज्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध नाही, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुलेनगरलगत असलेल्या गावठाण हद्दीत ग्रामपालिकेने स्वतःची जागा उपलब्ध करून देत नवीन घरकुलांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले .
तसेच वार्ड नंबर तीनमधील स्त्री शौचालय युनिट व संरक्षक भिंतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जैताणे गावाचे ग्रामदैवत आई भवानी मातेच्या मंदिरासमोर मोकळ्या जागेत ग्राम पालिकेने ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली.
वार्ड क्रमांक १मधील स्त्री शौचालयाचे भूमिपूजन व कामाची सुरुवात
करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे, ग्रामपालिका गटनेते बाजीराव पगारे, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, माजी उपसरपंच भगवान भलकारे, ग्रामपालिका सदस्य, राजेश बागुल, गणेश न्याहळदे, राकेश शेवाळे , गोकुळ पगारे, गोकुळ पाटील, पोपट चौधरी, लहूजी बोरसे, शाम भलकारे, नंदकुमार जाधव, हिम्मत मोरे, शांताराम मोरे, सत्तार मणियार, समाधान महाले, एकनाथ सोनवणे, यादव भदाणे, योगेश बोरसे, प्रदीप भदाणे व ग्रामस्थ उपस्थित होते.