पत्नीकडून पुर्वीच्या पतीस बेदम मारहाण

By Admin | Updated: May 27, 2017 13:41 IST2017-05-27T13:41:33+5:302017-05-27T13:41:33+5:30

न्यायालयात धाव : 9 जणांविरोधात दरोडा, दंगल व छळाचा गुन्हा दाखल

Better beat the husband of the previous wife | पत्नीकडून पुर्वीच्या पतीस बेदम मारहाण

पत्नीकडून पुर्वीच्या पतीस बेदम मारहाण

>ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि.27- प}ीने आपल्या पूर्वीच्या पतीला चोप दिल्याप्रकरणी प}ीसह नऊ जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी रात्री शिरपूर पोलिसात दरोडा, दंगल व छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
 क्रांतीनगरात राहणा:या दीपक संतोष शिरसाठ यांची प}ी आशाबाई हिने 6 फेब्रुवारी 2017 रोजी रवींद्र मगन पाटील यांच्याशी दुसरे लगA केले. त्यानंतर 20 मार्च रोजी सकाळी  दीपकला वाडी गावात आशाबाईसह  रवींद्र मगन पाटील, विमलबाई मगन पाटील, मगन सुका पाटील (रा. वाडी खुर्द), हिंमत दीपचंद पाटील, हिराबाई हिंमत पाटील, सुनील पंडित पाटील, सोनीबाई सुनील पाटील, गोटू देवीदास पाटील (रा. करवंद) या नऊ जणांनी मारहाण केली. 
त्यानंतर दीपक याच्या क्रांतीनगरातील घरात घुसून सामानाची तोडफोड करून 10 हजार रुपयांचे नुकसान केले आणि  8 हजार रुपये जबरीने काढून नेले. यासंदर्भात दीपक शिरसाठ यांची फिर्याद पोलिसांनी दाखल करून घेतली नव्हती. तेव्हा दीपकने न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: Better beat the husband of the previous wife