सुपारीचा ट्रक चोरणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:46 IST2019-07-18T22:46:36+5:302019-07-18T22:46:55+5:30

हाडाखेडची घटना :३९ लाखांचा होता मुद्देमाल, एकास अटक

The betel shopkeeper detained | सुपारीचा ट्रक चोरणारा अटकेत

सुपारीचा ट्रक चोरणारा अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर/पळासनेर : दिल्ली येथील बाहुबली ट्रान्सपोर्ट कंपनीचा चालक व  सहचालकाने ३९ लाखांत फसवणूक केल्याची घटना घडली होती, याप्रकरणी हरियाणात जावून एकाला ताब्यात घेण्यात आले़ 
कर्नाटक येथून दिल्ली येथे प्रत्येकी सत्तर किलो वजनाच्या सुपारी भरलेल्या तीनशे गोण्या ट्रक क्रमांक एचआर ४६ सी  ४४५३ यातून चालक जुगेंद्रा सिंह रोशन सिंग राहणार कबूल पूर आग्रा व सतपाल राहणार टीटोली रोहतक हरियाणा हे घेऊन जात होते. ते सागर कर्नाटक येथून दिल्लीकडे ३  जुलै ते ११  जुलै च्या दरम्यान जात होते. याच वेळी सागर कर्नाटक ते शिरपूर तालुक्यातील हाडाखेड दरम्यान त्यांनी ट्रकमधील मुद्देमाल स्वत:च्या फायद्यासाठी परस्पर विकून टाकला. आणि बाहुबली ट्रान्सपोर्ट बेंगलोर या कंपनीची फसवणूक केली. यामुळे दोघांवर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ या प्रकरणात सतपाल याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली़ 
 

Web Title: The betel shopkeeper detained